सभासदांना बचतीची सवय लावणे, त्यांच्या गरजा भागतील इतपत त्यांना कर्ज देणे व त्यांची वेळेवर वसुली करणे या तीन गोष्टी म्हणजे पतसंस्थेचा आत्मा होय! या तीन गोष्टींचे अतिशय काटेकोरपने पालन करणे हे मी व आमचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी यांनी पहिल्या दिवसापासूनच ठरवले आहे व त्यांचे पालन आम्ही सदैव करत आलो व करत राहू.

त्यासाठी सभासदांना आवर्त ठेव,दैनिक अल्पबचत ठेव , मुदत ठेव ,दामदुप्पट ठेव व बचत खात्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व वेळप्रसंगी अडचणीच्या वेळी हेच पैसे त्यांना कर्ज स्वरूपात देऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या व करत आहोत.

या सर्व योजनांना सभासद बंधूनी अपेक्षेपलीकडे उतस्फुर्त प्रतिसाद दिला आहे . कर्जाच्या परतफेडीसाठी आम्ही सर्वजन काटेकोरपणे तर लक्ष देतोच परंतु सभासद स्वतः देखील त्यासाठी जागरूक आहेत म्हणूनच तर आजपर्यंत एकही कर्ज बुडीत काढण्याचा प्रसंग संस्थेला आलेला नाही , हे सांगण्यास मला अत्यंत आनंद वाटतो.

श्री. गणेश कारभारी आर्ले

संस्थापक

आर्ले पाटील अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., कुकाणा